II गण गण गणात बोते II अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंदा सदगुरु श्री साईनाथ महाराज की जय ॥ II गण गण गणात बोते II मित्रानो, तुम्ही येथे मोफत [Free] विविध स्पर्धा परीक्षासाठी ऑनलाईन (ई-टेस्ट) सराव पेपर देऊन त्वरित निकाल पाहू शकता.!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आत्मचरित्रावर ई-टेस्ट:

Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आत्मचरित्रावर" 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. शिवाजी महाराजांचा जन्म १९ फ़ेब्रुवारी १६३० रोजी ……. किल्ल्यावर झाला.

राजगड
शिवनेरी
रायगड
यापैकी नाही


2. शिवाजी महाराजांचे आजोबा ……. हे मोठे धर्मनिष्ठ आणि परोपकारी होते. त्यांनी वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोध्दार केला.

विठोजी भोसले
शहाजी भोसले
मालोजी भोसले
बाबाजी भोसले


3. शिवाजी महाराज आपली आई ….. हिच्याबरोबर स.न. १६४२ मध्ये बंगळूरहून पुण्यात आले त्यावेळी पुण्यात विजापूरच्या आदिलशहाची सत्ता होती.

जिजाबाई
येसूबाई
सगुणाबाई
सोयराबाई


4. इ.स. १६४७ मध्ये अवघ्या १७ वर्षाच्या शिवरायांनी आदिलशहाच्या ताब्यातील …… जिंकून हिंदवी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली.

रायगड
तोरणगड
शिवनेरी
सिंधुदुर्ग


5. स.न. १६५६ च्या मे महिन्यात शिवरायांनी रायरीचा मजबूत किल्ला जिंकून घेऊन सन १६७० मध्ये या दुर्गम किल्ल्याला आपली राजधानी बनविले आणि ……… हे नाव दिले.

राजगड
रायगड
सिंहगड
यापैकी नाही


6. सन १६६० मध्ये शिवाजी महाराज पन्हाळगडावर असताना ------ या विजापूरच्या सरदाराने पन्हाळगडाला इतका कडेकोट वेढा घातला होता की मुंगीलाही बाहेर पडायला जागा नव्हती आणि पावसाळा समोर होता.

फ़ाजलखान
सिद्दी जौहर
रुस्तमे जमान
शाहिस्तेखान


7. मुगल सरदार ----- याला औरंगजेबाने दक्षिणेत शिवशाही व आदिलशाही संपवण्यासाठी पाठविले होते. येताना दहशत पसरविण्यासाठी तो स्वराज्यातील प्रदेश जिंकत व उध्वस्त करत पुण्याला येऊन लाल महालात तळ ठोकून बसला.

फ़ाजलखान
अफ़जलखान
यापैकी नाही
शाहिस्तेखान


8. ५ एप्रिल १६६३ रोजी मध्यरात्री काही निवडक लोकांबरोबर घेऊन शिवरायांनी----- येथे तळ ठोकून बसलेल्या शाहिस्तेखानावर गनिमीकाव्याने हल्ला करून त्याची चार बोटे तोडली.

शनिवारवाडा
लाल महाल
सिंहगड
यापैकी नाही


9. पुरंदरचा किल्लेदार ------ हा कमालीचा पराक्रम गाजवून धारातीर्थी पडला परंतु दिलेरखानाच्या चिथावणीला न भुलता पराक्रमाचा आदर्श त्याने इतिहासात नोंदविला.

तानाजी मालुसरे
प्रतापराव गुजर
मुरारबाजी
बाबाजी शिर्के


10. शिवाजी महाराजांनी तडजोड करण्यासाठी ११ जून १९६५ रोजी जयसिंहाकडे आपला _____ वकील पाठवला.

हंबीरराव मोहिते
रघुनाथ बल्लाळ
प्रतापराव गुजर
यापैकी नाही


11. पुरंदरच्या तहानुसार शिवाजीने आपले _____ किल्ले आणि त्याच्या आसपासचा चार लाख सुवर्णमुद्रांच्या मिळकतीचा मुलुख मोघलांना दिला.

23
24
25
यापाकी नाही


12. सिद्दी जौहरने ----- या किल्ल्याला चौफ़ेरवेढा घातला होता त्यावेळी शिवाजी महाराज या किल्ल्यावर होते.

विशाळगड
पन्हाळगड
सज्जनगड
कोंढाणा


13. शिवराय आग्र्याच्या कैदेतून निसटल्यावर त्यांच्या जागी थांबलेले दोघे जण कोण होते?

बाजी आणि दादाजी
नेताजी आणि पिराजी
तानाजी आणि येसाजी
हिरोजी आणि मदारी


14. "शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही. तो परत घे." हे जिजाऊंचे उदगार ऐकल्यापासून शिवरायांनी कोंढाणा स्वराज्यात घेण्याचे ठरविले. ती कामगिरी आपल्या डोक्यावर घेणारा वीर कोण?

तानाजी मालुसरे
नेताजी पालकर
प्रतापराव गुजर
बाजीप्रभू देशपांडे


15. ४ फ़ेब्रुवारी १६७० ला तानाजी मालुसरे, भाऊ सूर्याजी व शेलारमामा यांना सोबत घेऊन रात्रीच्या वेळी -------- हा गड स्वराज्यात सामील करून घेण्यासाठी निघाले.

तोरणा
पुरंदर
माहूली
कोंढाणा


16. ३ ऑक्टोबर १६७० ला शिवाजीने दुस-यावेळी सुरतेवर हल्ला केला. यावेळी सुमारे ------ लाखांची लूट मिळाली.

65
66
67
यापैकी नाही


17. शिवरायांच्या सैन्यात घोडदळ, पायदळ तसेच आरमारदल असे विभाग होते. पायदळाच्या प्रमुखाला काय म्हणत असत?

सरनोबत
शिलेदार
सेनापती
सरदार


18. शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत गुप्त हेरखाते होते. शिवरायांचे हेर गुप्तपणे शत्रूच्या गोटात शिरून गोटातील खडानखडा माहिती काढून आणत. त्यांच्या गुप्त हेरखात्याचा प्रमुख ------- हा होता.

बाजीप्रभू
तानाजी मालुसरे
बहिर्जी नाईक
यापैकी नाही


19. शिवाजी महाराजांच्या प्रधानमंडळातील ………. हे अमात्य होते.

हंबीरराव मोहिते
रामचंद्र निळकंठ मुजुमदार
निराजी रावजी
मोरो त्रिंबक पिंगळे


20. शिवरायांनी राज्यातील मुलकी व्यवस्था चोख ठेवली होती. स्वराज्यात ----- सुभे होते. सुभा म्हणजे प्रांत, विभाग. अशा विभागवार रचनेमुळे शिवरायांचा राज्यकारभार अतिशय चोख होता.

15
13
11
12





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?