II गण गण गणात बोते II अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंदा सदगुरु श्री साईनाथ महाराज की जय ॥ II गण गण गणात बोते II मित्रानो, तुम्ही येथे मोफत [Free] विविध स्पर्धा परीक्षासाठी ऑनलाईन (ई-टेस्ट) सराव पेपर देऊन त्वरित निकाल पाहू शकता.!

मुलाखतीची तयारी:

अधिकारी होण्याची सक्षमता उमेदवारात आहे की नाही, याचा अंदाज मुलाखतीत घेतला जातो. उमेदवारामधील आत्मविश्वास, दृष्टिकोन, प्रसंगावधान, चातुर्य, परिस्थिती हाताळण्याची हातोटी, मानसिक कणखरता, संयम, समाजाशी सुसंवाद साधण्याची कला इत्यादीची ही परीक्षा असते.

मुलाखत म्हणजे व्यक्तिमत्त्वाची चाचणी होय. आपल्या ज्ञानाची, माहितीची चाचणी पूर्व आणि मुख्य परीक्षेत घेतली जाते; पण अधिकारी होण्याची सक्षमता उमेदवारात आहे की नाही, याचा अंदाज मुलाखतीत घेतला जातो. मुलाखतीत उमेदवारामधील आत्मविश्वास, दृष्टिकोन, प्रसंगावधान, चातुर्य, परिस्थिती हाताळण्याची हातोटी, मानसिक कणखरता, संयम, समाजाशी सुसंवाद साधण्याची कला इ. ची परीक्षा घेतली जाते.

मुलाखतीसाठी काही टिप्स 

देहबोली : उमेदवाराची देहबोली सकारात्मक आणि आत्मविश्वासपूर्ण असावी. सरळ खांदे, ताठ मान, भेदक नजर असावी. बसताना ताठ बसा. हात मांडीवर सरळ रेषेत ठेवावे. विचित्र हालचाली, हावभाव अशा गोष्टी टाळाच.

बोलणं : बोलण्यात नैसगिर्कता आणि सहजता असावी. भाषण केल्यासारखे अथवा कृत्रिम संभाषण टाळा. बोलण्यातून रुबाब, मिजास न दाखविता विनम्र; पण ठामपणे आपला मुद्दा मांडावा. आवाज सदस्यांना ऐकू जाईल एवढा असावा. अलंकारिक शब्द, नाटकी वाक्ये टाळावी. एखाद्या प्रश्नाचे उत्तर न आल्यास सरळ सॉरी म्हणावं.

वेशभूषा : स्वच्छ आणि इस्त्री केलेले फॉर्मल कपडे घालावेत. कपडे भपकेबाज वा गडद नसावेत. सौम्य रंगाचे, व्यक्तिमत्त्वास साजेसे कपडे घालावे. टाय बांधण्याची आवश्यकता नाही.

दृष्टिकोन : आयोगाच्या तज्ज्ञ पॅनेलकडून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना सकारात्मक दृष्टिकोनातून बोलावे. आपल्या दृष्टिकोनातून सामाजिक भान व जाण दिसावी. वैयक्तिक टीका-टिप्पणी टाशकरू नये.न येणाऱ्या प्रश्नांबाबत प्रसंगावधान दाखवावे. पॅनेलच्या सर्व सदस्यांशी सुसंवाद साधावा.

आत्मविश्वास : मुलाखतीत उमेदवारांचा आत्मविश्वास बोलण्यातून आणि देहबोलीतून दिसला पाहिजे. उत्तर आले नाही, तर घाबरून कावरेबावरे होऊ नये. प्रश्नाचे उत्तर आले, म्हणजे मार्क मिळतात असे नाही, तर तुम्ही त्यास कसे सामोरे जाता, हे महत्त्वाचे. मुलाखत संपल्यानंतर सर्वांचे आभार मानून तेवढ्याच आत्मविश्वासाने मुलाखत कक्षातून बाहेर पडावे.

मुलाखतीची तयारी 

वैयक्तिक माहिती : शैक्षणिक, कौटुंबिक माहिती, छंद इत्यादी संदर्भात प्रश्न-उपप्रश्नांची तयारी करावी.

जिल्ह्याची माहिती : जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी यांची नावं माहिती करून ठेवा. जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रसिद्ध ठिकाणे, भौगोलिक व इतर विशेष प्रसिद्ध व्यक्ती इ. माहिती गोळा करावी.

पोलीस प्रशासनासंबंधी माहिती : पोलीस खात्यात का यावेसं वाटतं, खात्यासंबंधी दृष्टिकोन, खात्याची संरचना, आव्हाने, अडचणी, विविध अधिकारी यासंबंधी माहिती घेऊन ठेवणं.

सामान्य ज्ञान : प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकीय, आथिर्क, सांस्कृतिक घडामोडींची तयारी करावी.

डॉ. चिदानंद आवळेकर 
'महान्यूज' महाराष्ट्र शासन